आंबेजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात योग दिन साजरा
*अंबाजोगाई न्यायालयात योग दिन साजरा तसेच वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न*
*अंबाजोगाई:- जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय,तालुका विधी सेवा समिती, अंबाजोगाई व वकिल संघ, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१.०६ २०२५ रोजी सकाळी ०७.१५ ते ०७ ५० या वेळेत जिल्हा न्यायालय, अंबाजोगाई न्यायालयावे प्रांगणात जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.*
*सदर योग्य शिबिर मध्ये वकील संघाच्या सदस्या ऍड.प्रिया सुनील आगळे व योग शिक्षिका मीरा विश्वास असबे यांनी मार्गदर्शन करून योग करून घेतला.*
*त्यानंतर दिवाणी न्यायालयाचे आवारात मा. न्यायाधीश, वकील संघाचे पदाधिकारी, न्यायालयीन कर्मचारी यांचे हसे १५ वृक्ष लावून वृक्षारोपण करण्यात आले.*
*सदरील कार्यक्रमास मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.अजित कुमार भस्मे, दिवाणी न्यायाधीश व.स्तर मा. कालिदास सूर्यवंशी, मा. भानुप्रताप चौहान, मा.महावीर सोनटक्के, मा. सतिशकुमार गणपा, दिवाणी न्यायाधीश .स्तर मा. प्रभाकर सगडे,मा. प्रियंका लिगडे, मा. अश्विनी ढवळे तसेच वकील संघाचे अध्यक्ष ऍड.अजित लोमटे, उपाध्यक्ष ऍड.दिलीप गोरे,सहसचिव ऍड.बळीराम पुरी, तसेच सर्व न्यायालयीन कर्मचारी,वकील संघाचे सदस्य तसेंच सिद्धेश्वर स्वामी हे उपस्थित होते.
