परळीत मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांची व्यापक बैठक,,!
परळीत मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांची व्यापक बैठक संपन्न
परळी प्रतिनिधी
परळी या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीने आज दिनांक पाच रोजी परळी तालुक्यातील ग्रामीण भागातील मातंग समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक परळीतील चेंबरी रेस्ट हाऊस या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीमध्ये येणाऱ्या 20 मे रोजी आझाद मैदान मुंबई येथे मातंग समाजाच्या अ ब क ड आरक्षण वर्गीकरणाच्या आंदोलनासाठी जन आंदोलन आयोजित करण्यात आलेला आहे त्या जन आंदोलनाला परळी तालुक्यातील मातंग समाजाने महिला व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहो अशा पद्धतीचं आवाहन लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. माणिक कांबळे यांनी आवाहन केले डॉ.कांबळे आपल्या मार्गदर्शन पर भाषणामध्ये म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्या चळवळीपासून मातंग समाजाच्या अ ब क ड वर्गीकरणाची चळवळ महाराष्ट्रात चालू असून या चळवळीला आता लढ्याच रूप आलेल आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला तमाम महाराष्ट्रातल्या मातंग समाज या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे या आंदोलनाला हातभार म्हणून तालुक्यातील मातंग समाजाने 20 मे रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर होणाऱ्या जन आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे.
