जयवंती नदीचा अहवाल देऊन आठ दिवसात अतिक्रमणे काढू : मुख्याधिकारी प्रियंका टोंगे
जयवंती नदीच्या जायमोक्याची संयुक्त पाहणी करून 8 दिवसाच्या आत अहवाल देवून अतिक्रमण काढू- मुख्याधिकारी प्रियंका टोंगे
अंबाजोगाई-
जयवंती नदीपात्रातील अतिक्रमण काढावे या मागणीसाठी मागील तीन दिवसापासून अभिजीत लोमटे यांचे आमरण उपोषण चालू होते नगरपरिषद च्या मुख्याधिकारी यांनी मागण्या मान्य करत लेखी आश्वासन दिल्यानंतर आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले असून अहवाल प्राप्त होईपर्यंत साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
अंबाजोगाई शहरात धन दांडग्यांनी अतिक्रमण केल्याने नदीचा प्रवाह बंद झाला असून हे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे वंदीचा प्रवाह मोकळा करावा तसेच जावक क्रमांक 880 उपविभागीय अधिकारी यांनी सहाय्यक आयुक्त यांच्या पत्राचा संदर्भ देत तहसीलदार व मुख्याधिकारी यांना जाय मोक्यावर जाऊन पाहणी करून अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले होते या निर्देशाचे पालन करावे या मागणीसाठी डिजिटल मीडिया परिषद अंबाजोगाई चे अध्यक्ष अभिजीत लोमटे हे 29 एप्रिल आमरण उपोषणास बसले होते या उपोषणास अंबाजोगाईतील सर्वसाधारण नागरिक तसेच सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी उपोषण स्थळी येत पाठिंबा दर्शवला उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी अंबाजोगाई नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे, कार्यालयीन अधीक्षक रमेश सोनकांबळे, स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांनी उपोषण कर्ते अभिजीत लोमटे यांची भेट घेत जा क्र 880 उपविभागीय अधिकारी यांच्या निर्देशानुसार जाय मोक्यावर जाऊन तहसीलदार व मुख्याधिकारी संयुक्त पाहणी करून जयवंती नदी पात्रातील अधिकृत परवानधारक व अनधिकृत बांधकामाची माहिती अहवाल आठ दिवसाच्या आत सदरील अहवाल तयार करून एक प्रत अभिजीत लोमटे देण्याचे लेखी आश्वासन दिले व भूमी अभिलेख कार्यालयास तात्काळ वीज भरून नदी पात्राची मोजणी करण्याचे तसेच मुख्य रस्त्यावरील जयवंती नदीच्या पुलाखालील दोन कनग्या बुजवून नदीचा प्रवाह रोखला आहे सदरील पुलाखालील कनग्या रिकाम्या करून नदीचा प्रवाह पूर्ववत करण्याची हमी दिल्याने माननीय मुख्य अधिकारी प्रियंका टोंगे यांच्या विनंतीवरून व लेखी आश्वासनानंतर डिजिटल मीडिया परिषद चे अध्यक्ष अभिजीत लोमटे यांनी आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करून जोपर्यंत अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत डिजिटल मीडिया परिषदेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने नगरपरिषद कार्यालया समोर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अभिजीत लोमटे यांचे आमरण उपोषण सोडवताना माजी आमदार पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष असेफोद्दीन खतीब, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार,अ.र पटेल, सतीश मोरे, सुधाकर देशमुख,वंचित चे गोविंद मस्के, आरेफ सिद्दीकी, संजय जोगदंड, अहमद पठाण, मनोज कोकणे,योगेश डाके,उत्तरेश्वर शिंदे व डिजिटल मीडियाचे सर्व सदस्य उपस्थित होते….
