खोलेश्वर विद्यालयाच्या क्रीडा शिक्षकाला 14 वर्ष सक्त मजुरी,,,!
श्याम वारकड याला 14 वर्षे फक्त मजुरी व एक लाख रुपये दंड,,,!
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. दिपक खोचे यांनी विद्यार्थ्यांनीवर बलात्कार प्रकरणी आरोपीस 14 वर्षे सक्त मजुरी व 1 लाख 2 हजार रूपयाच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सदर प्रकरणील हकीकत अशी की, अंबाजोगाई येथील खोलेश्वर विद्य लियातील शिक्षक आरोपी शाम वारकड याने त्याच शाळेतील विद्यार्थीनीवर बलात्कार केला अशा प्रकारची घटना सन 2019 मध्ये घडली होती. सदर प्रकरणात पिडीत मुलीच्या आईने फिर्याद देवुन तिच्या मुलीने किडा शिक्षक आरोपी शाम वारकड याने जालना येथे स्पर्धेसाठी खेळावयास जावुन अंबाजोगाई आल्यानंतर तिच्यावर किडा संकुल अंबाजोगाई येथे बलात्कार केला व सदर प्रकरणाची माहिती कोणास सांगितली तर तुला व तुइ-या आईवडीलांना जिवे मारून टाकुन अशा प्रकारची धमकी दिली. सदरची बाब ही पिडीत मुलीच्या शाळेतील वर्तुणुकीतून तिच्या शाळेतील शिक्षीकेस लक्षात आली. तसेच मानवलोक या सामाजिक संस्थेतर्फे शाळेमध्ये लहान विद्यार्थीनींना चागला स्पर्श वाईट स्पर्श या विषयावर चर्चासत्र आयोजीत करण्यात आले होते. त्यावेळी शाळेतील शिक्षीकेने पिडीत मुलीच्या वर्तुणुकीत झालेला बदलामुळे तिस तिच्या आईवडीलांना घरी घेवुन येण्यास सांगितले व पिडीत मुलीच्या शाळेतील वर्तणुकीत झालेला बदल तिच्या आईवडीलांना सांगितला. त्यावरून पिडीत मुलीच्या आईवडीलांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने आरोपीने तिच्यासोबत दि. 17-10-2019 रोजी कुकर्म केल्याचे सांगितले. त्यावरून पिडीत मुलीच्या आईने दि. 18-12-2019 रोजी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यास फिर्याद दिली. त्यावरून गुरनं 545/2019 कलम 354-अ. 376 (एफ) (आय) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 4. 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी श्री राहुल धस यांच्याकडे देण्यात आला. त्यावरून तपासअधिकारी यांनी तपास करून आरोपीविरुद्ध मा. जिल्हा व सत्र न्यायालय अंबाजोगाई येथे दोषारोपपत्र दाखल केले.
सदर प्रकरणाचा साक्षपुरावा चालु झाल्यानंतर सरकार पक्षाच्या वतीने अॅड.लक्ष्मण फड यांनी सरकार पक्षातर्फे एकुण 11 साक्षीदार तपासले. त्यात पिडीत मुलगी व फिर्यादी तिची आई या दोघींची साक्ष अत्यंत महत्वाच्या ठरल्या. तर बचाव पक्षाच्या वतीने 2 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षपुरावा संपल्यानंतर दोन्ही बाजुचा मा. न्यायालयात युक्तीवाद पुर्ण केला. सरकारी पक्षाच्या वतीने केलेला युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस 354-अ, 376 (2) (एफ) (आय) व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 4, 8, 12 प्रमाणे दोषी धरून आरोपीस 14 वर्षाची सक्त मजुरी व दंड ठोठावला. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. सरकारी वकील अॅड. लक्ष्मण फड यांनी काम पाहिले तर त्यांना पैरवी म्हणुन गोविंद कदम व बाबुराव सोडगीर यांनी सहकार्य केले.
