पत्रकार मारुती जोगदंड यांना मातृ शोक,,,!
निर्भीड पत्रकार मारुती जोगदंड यांना मातृ शोक,,!
आंबेजोगाई (प्रतिनिधी)
येथील निर्भीड पत्रकार, मारुती धोंडीराम जोगदंड यांच्या आई पदमीनबाई धोंडीराम जोगदंड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून, भीम नगर साठे नगर समता नगर फुलेनगर सह संपूर्ण जोगदंड परिवार दुःखाच्या सागरात बुडालेला आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी 10:30 वाजता साठे नगर परळी वेस येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती लक्षणीय होती. कष्टाळू जिद्दी मायाळू आई गेल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होताना दिसत असून, त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली नातवंडे असा परिवार आहे.
