सुप्रसिद्ध ऍड. शिवाजी कांबळे यांना पितृशोक,,,!
*निधन वार्ता*
*देवाजी कांबळे यांचे निधन*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
आदर्श शिक्षक देवाजी मारूती कांबळे यांचे शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बोरूळा तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोमनाथ बोरगाव येथील रहिवासी तथा जुन्या पिढीतील आदर्श शिक्षक देवाजी मारूती कांबळे (वय ८० वर्षे) यांचे अंबाजोगाई येथे शुक्रवार, दिनांक ११ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील सुप्रसिध्द विधीज्ञ तथा समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव ऍड.शिवाजी कांबळे यांचे ते वडील होत. शोकाकुल वातावरणात आदर्श शिक्षक देवाजी मारूती कांबळे यांच्या पार्थिवावर बोरूळा तलाव स्मशानभूमीत शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक उपस्थित होते.
