*क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले जयंतीनिमित्त स्मारक निर्मितीचा संकल्प.*
स्मारक ही प्रेरणा देणारी उर्जास्थाने असतात :- उदघाटक डॉ राजेश इंगोले
प्रतिनिधी, (अंबाजोगाई)
अंबाजोगाई येथे माळीनगर परिसरात महात्मा ज्योतीराव फुले यांची १९८ वी जयंती नुकतीच साजरी केली गेली.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा मधुकरराव इंगोले यांनी इथे सोसायटी स्थापन करत असतानाच येथे महात्मा फुले यांच्या कार्याला उजाळा मिळावा म्हणून येथे स्मारक व्हावे याकरिता जागा राखून ठेवली होती. त्याबाबत रीतसर प्रक्रिया करून या जागेवर महात्मा फुले स्मारक बनावे याकरिता त्यांनी प्रयत्न केला होता.
महात्मा फुले यांच्या १९८ व्या जयंतीनिमित्त येथे जयंती साजरी करत असताना या ठिकाणी महात्मा फुले स्मारक निर्मितीचा संकल्प परिसरातील सर्व नागरिकांनी व्यक्त केला.
यावेळी या विचारपीठावर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ तथा अंबाजोगाई नगर परिषदेचे माजी शिक्षण सभापती डॉ राजेश इंगोले ,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बुद्धीष्ट इंटरनेशनल स्कुलचे रत्नदीप गोरे, अंबाजोगाईचे पी एस आय ज्ञानेश्वर कांबळे तर व्याख्याते म्हणून व्याख्याते म्हणून योगेश्वरी शिक्षण संस्थेचे हेमंत धानोरकर, बाळासाहेब मसने, पत्रकार प्रा गोविंद जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरवातीला महात्मा फुले स्मारकाच्या नाम फलकाचे अनावरण उदघाटक डॉ राजेश इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले,घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतीज्योती माई सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहुजी महाराजयांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या उदघाटकीय भाषणात बोलतांना डॉ राजेश इंगोले यांनी आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे हे मुलाचे आद्यकर्तव्य असते. माझ्या वडिलांनी ही सोसायटी करतांना इथे महात्मा फुले स्मारक असावे हे स्वप्न पाहिले होते आणि त्यासाठी येथे जागेची तजबीजही करून ठेवली होती. मध्यंतरात त्यांची प्रकृती स्थिर नसल्याने त्यांना या स्मारकाच्या निर्माणाबाबत काही कार्यवाही करता आली नाही याची खंतही त्यांनी मला बोलताना अनेकदा व्यक्त केली होती.
परंतु त्यांच्या या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी आता मी पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी येथे उपस्थितांना दिली.
हे स्मारक भव्य दिव्य असेल आणि हे स्मारक महात्मा फुल्यांच्या ऐतिहासीक कार्याला सतत उजाळा देत राहील आणि समाजाला प्रेरणा देत राहील याची काळजी ही स्मारक समिती घेणार असल्याचे सांगितले.
महापुरुषांची स्मारके ही त्यांच्या कार्याची प्रतीके असतात त्यामुळे ती उभारली गेलीच पाहिजे कारण ही प्रतीके समोर असतील तरच त्या कार्याची आठवण राहते आणि समाजात सामाजिक प्रबोधनाची प्रक्रिया गतिमान राहते असे मत डॉ राजेश इंगोले यांनी व्यक्त केले.
जगातील सर्वोत्तम गुरू शिष्याचं नात कोणतं होत तर ते महात्मा फुले आणि घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच होत कारण महात्मा फुले या गुरूच सामाजीक न्यायाच,समतेच,बंधुतेच प्रत्येक स्वप्न त्यांच्या सर्वोत्तम शिष्याने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केलं अस प्रतिपादन डॉ राजेश इंगोले यांनी केले.
यावेळी बोलतांना प्रा किरण चक्रे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत हे स्मारक सामाजीक क्रांतीच प्रतीक म्हणून उभं राहिलं अस मत व्यक्त केले.
यावेळी हेमंत धानोरकर यांनी महात्मा फुले यांचे न उलगडलेले अनेक पैलू,अप्रकाशीत अस सामाजिक कार्य याची नाविन्यपूर्ण माहिती उपस्थितांना दिली. पत्रकार प्रा गोविंद जाधव यांनी महात्मा फुले हे क्रांतीच अजब रसायन होत. त्यांनी स्रियांना, शेतकऱ्यांना, दिनदलितांना बळ देण्याचं काम आयुष्यभर केले असे गौरवोद्गार काढले.
बी के मसने यांनी महात्मा फुले स्मारक निर्मिती ही सर्वानी लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न करावेत याकामी डॉ राजेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण ताकतीने काम करूयात आणि हे स्मारक निर्मितीचे कार्य तडीस नेवुयात असे आश्वासन दिले आणि महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
आपल्या अध्यक्षीय समारोपात बोलतांना रत्नदीप गोरे यांनी महापुरुष हे कोण्या एका जातीचे नसतात तर ते संपूर्ण समाजाचे असतात त्यांचे कार्य सगळ्या समाजाला उद्गारण्याचे काम करत असतात. महात्मा फुले स्मारक बनवण्यासाठी डॉ राजेश इंगोले यांनी पुढाकार घेतला, सहकार्याची भावना ठेवली भविष्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य स्मारक निर्मितीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे यांच्यासह प्रा अनिल नरसिंगे,ओव्हाळ यांची समायोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वैभव कदम यांनी केले.
यावेळी समस्त महात्मा फुले प्रेमींच्या वतीने या स्मारक निर्मिती बाबत सकारात्मक भूमिका घेऊन पुढाकार घेतल्याबद्दल डॉ राजेश इंगोले यांचा सहृदय सत्कार करण्यात आला.
