घाटनांदुर ते आंबेजोगाई रेल्वे मार्गासाठी चिराग पासवान यांना राजेश व्हावळे यांचे निवेदन,,,!
घाटनांदुर ते अंबाजोगाई रेल्वे मार्गासाठी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्याकडे मागणीचे निवेदन ….राजेश वाहुळे
शिर्डी : केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री चिराग रामविलास पासवान हे दिनांक 10 4 2025 रोजी महाराष्ट्रात शिर्डी येथे सहकुटुंब दर्शनासाठी आले असता मराठवाड्याच्या वतीने त्यांची भेट घेऊन अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने घाटनांदुर ते अंबाजोगाई रेल्वे मार्गाची मागणी करण्यात आली तसेच सोमनाथ सूर्यवंशी शिरूर कासार येथील झापेवाडी पारधी वस्ती वरील हल्ल्याचा व घरे पेटवून दिल्या संदर्भातील माहिती व गायरान प्रकरणी दलितावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भातील पूर्ण माहिती देण्यात आली तसेच मराठवाड्यातील बेरोजगारी विषयी मुद्दे मांडून युवकांच्या हाताला काही काम मिळावे या उद्देशाने अन्न व प्रक्रिया मंत्रालयाच्या वतीने उद्योग उभारणी संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री शिरापासून यांच्याशी सविस्तर सकारात्मक चर्चा झाली या आशयाचे निवेदन जमुई मतदार संघाचे खासदार श्री अरुण भारती जी यांना देताना भीमशक्ती सामाजिक संघटनेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष भीमराव सरवदे साहेब लोक जनशक्ती पार्टीचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहुळे लोक जनशक्ती पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष अशोक भैया काळे परळी विधानसभा मतदारसंघाचे तालुकाध्यक्ष विशाल भैया शेवाळे भीमशक्तीचे अंबाजोगाई तालुका अध्यक्ष सुमित भैय्या आवाडे भीमशक्तीचे अंबाजोगाई तालुका उपाध्यक्ष शुभम तर्फे व इतर
