अंबाजोगाई

योगेश्वरी मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड अंबाजोगाईस मार्च 2025 अखेरीस 65..34 लाखाचा निव्वळ नफा,,,!

Spread the love

 

*श्री योगेश्वरी मल्टिस्टेट को- ऑप क्रेडीट सोसायटी लि. अंबाजोगाईस मार्च २०२५ अखेरीस ६५.३४ लाखांचा निव्वळ नफा*

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- समाजातील प्रत्येक घटकांची उन्नती या उक्तीवर चालणारी श्री योगेश्वरी मल्टिस्टेट को -ऑप क्रेडिट सोसायटी लि.ला आर्थिक वर्ष मार्च २०२५ अखेर रुपये ६५.३४ लाखाचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रिकबचंद सोळंकी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देतांना सांगितले . समाजातील प्रत्येक घटकांची उन्नती हेच या संस्थेचे ध्येय धोरण असून या धोरणावरच ही संस्था कार्यरत असल्याचे सांगितले. संस्थेस मिळालेल्या या संपूर्ण यशाचे श्रेय हे श्री योगेश्वरी मल्टिस्टेटचे संस्थापक राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेला दिले. तसेच श्री योगेश्वरी मल्टिस्टेटचे उपाध्यक्ष शेख अन्वर शेख वली हसन , संचालक सुधाकर हरिश्चंद्र टेकाळे , ऍड लोमटे अनिल संभाजीराव, जाधव विलास सिद्राम, संकाये अप्पासाहेब त्रिंबकअप्पा,ऍड विलास शिवाजीराव लोखंडे, भागवत रामकृष्ण मसने,तसेच शेख मुक्तार फकीर अहमद, संचालिका आशालता विश्वजित वांजरखेडकर, सौ खडके मंदाकिनी बाजीराव त्याचबरोबर तज्ञ संचालक कांतीलाल नंदलाल शर्मा आणि सचिन लक्ष्मीकांत बजाज यांच्यासह संस्थेचे सर्व हितचिंतक सभासद ग्राहक , ठेवीदार आणि कर्जदार यांना दिले.

           श्री योगेश्वरी मल्टिस्टेटचे अध्यक्ष रिकबचंद सोळंकी यांनी मार्च २०२५ अखेरची आर्थिक स्थिती विशद करतांना संस्थापक राजकिशोर मोदी यांच्यासह संस्थेच्या सर्व सभासद , ग्राहक ,आणि संस्थेच्या हितचिंतकांच्या सहकार्याच्या बळावरच हे शक्य झाल्याचे नमूद केले. मागच्या काही काळापासून अनेक बँका , पतसंस्था , मल्टिस्टेट सोसायटी या अनेक अडचणींना सामोरे जात आहेत .असे असताना देखिल श्री योगेश्वरी मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी ही आपली नेत्रदीपक कामगीरी करत असल्याचे सोळंकी यांनी अभिमनाने सांगितले. यात संस्थेच्या ग्राहकांचा , ठेवीदारांचा , खातेदार आणि हितचिंतक यांचा मोलाचा वाटा असल्याचे देखील आवर्जून उल्लेखित केले .

          पुढे संस्थेच्या आर्थिक विवेनचनात मार्च २०२५ अखेर संस्थेचे एकूण १७२८ सभासद असल्याचे सांगितले .संस्थेचे भाग भांडवल एकूण रुपये ७० लक्ष असल्याचे सांगताना संस्थेचा स्वनिधीं हा रुपये ०३ कोटी असल्याचे वार्षिक अहवालात नमूद केले. तसेच मार्च २०२५ अखेर संस्थेकडे एकूण ठेवी रुपये २६.३३ कोटी एवढया असून संस्थेचे ग्राहकांना कर्जवाटप हे रुपये १८ कोटी एवढे झाले असल्याचे देखील अधोरेखित केले . श्री योगेश्वरी मल्टिस्टेट या संस्थेची एकूण गुंतवणूक ही अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँक आणि इतर संस्थेकडे मिळून रुपये १४.४३ कोटी एवढी असल्याचे सांगितले.संस्थेच्या वार्षिक अहवालात संस्थेचा एन पी ए ४.२८ एवढा दर्शविण्यात आला आहे. मल्टिस्टेट च्या माध्यमातून अनेक लहान मोठ्या व्यापारी व ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी सदैव प्रयत्न केले जात आहेत.

      तसेच २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात ३१ मार्च २०२५ अखेर श्री योगेश्वरी मल्टिस्टेट या संस्थेने ६५.३४ लक्ष रुपये एवढा निवळ नफा मिळविला असल्याचे आवर्जून संस्थेचे अध्यक्ष रिकबचंद सोळंकी, उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष ढगे यांनी सांगितले . आजमितीला संस्थेच्या मुख्यालयात ७ कर्मचारी आणि २ नित्य निधी ठेव प्रतिनिधी कार्यरत आहेत. यामध्ये मुख्य शाखा व्यवस्थापक प्रदीप काकडे, विष्णु गुजर ,उमेश साखरे , वैभव देशमुख, संजुकुमार बिराजदार आणि अंकुश माने यांचा समावेश आहे . श्री योगेश्वरी मल्टिस्टेट या संस्थेच्या अंबाजोगाई आणि बसवकल्याण या दोन शहरात दोन शाखा कार्यरत असून या शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देत असल्याचे संस्थापक राजकिशोर मोदी व अध्यक्ष रिकबचंद सोळंकी यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!