बीड

प्रशासनाच्या लेखी पत्रामुळे भाई राजेश कुमार जोगदंड यांचे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित: गौतम आगळे

Spread the love

 

*जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग यांच्या लेखी पत्रामुळे भाई राजेशकुमार जोगदंड यांचे अन्नत्याग उपोषण तुर्त स्थगित* – *भाई गौतम आगळे सर*

 

बीड०४(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद/नगरपंचायत च्या अधिनस्त कंत्राटदार व मुख्य अभियंता,औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व विभाग प्रमुख यांच्या अधिनस्त कंत्राटदार कंत्राटी कामगारांना शासनाने निर्धारित केलेले किमान वेतन आणि इतर सोयी सुविधा मागील अनेक वर्षापासून देत नसल्याने आणि नगरपरिषद बीड आस्थापनेतील फक्त सफाई कंत्राटी कामगारांना अयोग्य व बेकायदेशीरपणे मागील 22 महिन्यापासून कामावरून कमी केले त्यांना नोकरीच्या व पगाराच्या सलगते सह पूर्ववत कामावर रुजू करून घ्यावे याकरिता 24 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,बीड समोर “रोजंदारी मजदूर सेना मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेश कुमार जोगदंड यांनी उपोषण सुरू केले होते; दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 17 : 55 वाजता सलग अकराव्या दिवशी जिल्हा सह आयुक्त, (प्र)नगर परिषद प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड त्र्यंबक कांबळे यांच्या सहीचे लेखी पत्र दिल्यामुळे तुर्तास अन्नत्याग उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे संघटनेचे केंद्रीय महासचिव तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी दिली आहे.

      याबाबत सविस्तर वृत्त असे की आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांचे आदेश क्रमांक नपप्रसं/ 2024 /सर्व नप / कंत्राटी कर्मचारी/ कक्ष 6/5066 दिनांक : 24 AUG 2024 आणि कार्यकारी संचालक( मास ) डॉ. नितीन वाघ यांचे पत्र क्र.औसवि/कंका/ वेतन/ 464 / 10720/ दिनांक: 24 OCT 2024 रोजी एक परिपत्रक निर्गमित केले होते. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, शासनास व कंत्राटी कामगारांना फसवून त्यांचे वेतन हडप करणाऱ्या कंत्राटदारावर मकोका अंतर्गत कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावे, कंत्राटी कामगारांना त्यांच्या वेतनातील फरक आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी याकरिता संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेश कुमार जोगदंड यांनी सोमवार दिनांक 24 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता अन्नत्याग उपोषणास सुरुवात केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांचे पत्र त्यांचे प्रतिनिधी श्री केंद्रे,श्री.कंठक आणि पोलिस प्रशासनाचे प्रतिनिधी यांनी देऊन उपोषण कर्ते यांना फळांचा ज्युस पाजून उपोषण सोडण्यात आले. विषयांकित प्रकरणी जिल्हाधिकारी महोदय बीड यांची तारीख व वेळ तात्काळ आपणास निश्चितपणे कळविण्यात येईल. करिता आपण आपले सुरू केलेले अन्नत्याग उपोषण तूर्त मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती लेखी पत्रात केल्यामुळे गुरुवार दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 17 : 55 वा. सलग 11दिवस सुरू असलेले आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. येत्या 08 दिवसात सदरील प्रकरणी जिल्हाधिकारी, बीड यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठकीची तारीख आणि वेळ तात्काळ कळवावी अन्यथा पुन्हा आपल्या कार्यालया पुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.

*चौकट* उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री अजित पवार 02 एप्रिल 2025 रोजी जिल्हा दौऱ्यावर आले असता ते आंदोलन स्थळी येतील अन्नत्याग उपोषणकर्त्याची भेट घेतील, आणि निवेदन स्वीकारतील असे पोलीस प्रशासनाने आश्वासन दिले होते. मात्र तसे काहीच न झाल्याने कामगार नेते भाई गौतम आगळे सर व कंत्राटी कामगारांचा संयमाचा बांध फुटला आणि जिल्हाधिकारी बीड यांच्या दालनासमोर शासनाच्या व जिल्हा प्रशासनाच्या विरोधात गगनभेदी घोषणा सुरू केल्या. त्यानंतर पोलिस प्रशासन डीएसबी चे सचिन सानप यांनी मध्यस्थी करून कामगार नेते भाई गौतम आगळे व त्यांच्या शिष्टमंडळाची मंत्री महोदय अजित पवार यांची भेट घालून दिली. असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!