योगेश्वरी शिक्षण संस्थेने शिक्षणाचे क्षेत्र सोडून व्यवसायाकडे वळणे बंद करावे : लोक जनशक्ती पार्टी
योगेश्वरी शिक्षण संस्थेने शिक्षणाचे क्षेत्र सोडून व्यवसायाकडे वळणे बंद करावे ……..लोक जनशक्ती पार्टी (र)
अंबाजोगाई :
…………… अंबाजोगाई येथे योगेश्वरी शिक्षण संस्था ही नामांकित शिक्षण संस्था आहे सदर शिक्षण संस्थेमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन आपले भविष्य घडवत आहेत परंतु अशा नामांकित संस्थेने मुख्य रस्त्यावर त्यांच्या जागेत अनधिकरितपणे व्यावसायिक गाळे बांधकाम केले आहेत सदर गाडी बांधकाम झाल्यामुळे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे व्यवसाय सुरू होतील महाविद्यालय शिक्षण घेणारे विद्यार्थी व विद्यार्थिनींना त्या व्यवसायापासून अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे या ठिकाणी हॉटेल टपऱ्या विविध अवैध धंदे सुरू होऊन विद्यार्थ्यांना व्यसनाधीनता निर्माण होईल तसेच या ठिकाणी येणारे पुकार मुले हे विद्यार्थिनींची छेडछाड करतील यामुळे विद्यार्थिनींना बऱ्याच अडचणी निर्माण होतील तसेच या ठिकाणी मुलींची गोदावरी बाई कुंकू योगेश्वरी शाळा आहे यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनींना खूप अडचणी येतील योगेश्वरी शिक्षण संस्थेसाठी शासनाने जागा दिलेली असून ती फक्त शैक्षणिक प्रयोजनासाठी दिलेली आहे त्या ठिकाणी संस्थेत कसल्याही प्रकारे व्यावसायिक गाळे बांधून त्यातून उत्पन्न घेता येणार नाही संस्था ही विद्यार्थ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करून सदर ठिकाणी अवैधरित्या गाळे बांधकाम करीत आहेत हे पूर्णपणे वेधशायदेशीर असून संस्थेच्या नियमाच्या विरुद्ध हे सर्व सुरू आहे मागील वर्षी संस्थेचे कार्यकारी मंडळ बदलले असून ते मनमानी कारभार करीत असल्याचे दिसत आहे देणगीच्या स्वरूपात भरमसाठ निधी जमा होतो तरीसुद्धा पैशाच्या हव्यासापोटी यांनी व्यावसायिक गाळे बांधकाम सुरू केले आहे सदर ठिकाणी हॉटेल व्यावसायिक गुटखा विक्रेते पान टपऱ्या चायनीज वाले मानस विक्रेते व इतर प्रकारचे अवैध धंदे सुरू होण्यास वेळ लागणार नाही विद्यार्थी हे महाविद्यालयात न जाता तेथेच टाइमपास म्हणून वेळ घालवतील त्याचाच परिणाम त्यांच्या शिक्षणावर होईल तसेच गावातील टुकार मुले येथे बसून मुलींची छेडछाड काढतील त्याचा परिणाम प्रशासनावर होईल तरी आपणास विनंती आहे की योगेश्वरी शिक्षण संस्थेची जागा ही शैक्षणिक प्रयोजनासाठी असल्याने त्यांना सदर ठिकाणी गाळे बांधकाम झालेले असून ते तत्काळ पाडण्यात यावे व सदर जागेचा वापर शैक्षणिक प्रजननासाठी करण्यात यावा व ज्या कार्यालयाने सदर बांधकाम परवानगी दिली त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करावेत अन्यथा लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल आशयाचे निवेदन देताना लोक जनशक्ती पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष अशोक भैया काळे परळी विधानसभा तालुका अध्यक्ष विशाल भैया शेवाळे लोक जनशक्ती पार्टीचे केस तालुका अध्यक्ष गंगाधर भैय्या पोळ लोक जनशक्ती पार्टी तालुका उपाध्यक्ष आदित्य भैया चौरे व इतर
