सेवानिवृत्त गटविकास अधिकारी काशिनाथ रापतवार यांचे निधन
सेवानिवृत्त गटविकास अधिकारी
काशिनाथ रापतवार यांचे निधन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
सेवानिवृत्त गटविकास अधिकारी तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ रापतवार यांचे वृद्धापकाळाच्या आजाराने २१ मार्च रोजी पहाटे १:३० वाजता निधन झाले.
काशिनाथ रापतवार यांचा जन्म १९४१ साली अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सर्वसामान्य कुटुंबात झाला. मोठ्या भावाचा शिक्षणाचा आदर्श घेत त्यांनी आपले पदवी पर्यंतचे शिक्षण स्वामी रामानंद तीर्थ कला व वाणिज्य महाविद्यालयात पुर्ण केले. या महाविद्यालयाच्या पहिल्या पदवीधर बॅचचे ते विद्यार्थी होते.
पदवीची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद विभागात विस्तार अधिकारी म्हणून सेवारत झाले. आणि गटविकास अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले.
एक प्रामाणिक, निष्कलंक आणि लोकाभिमुख काम करणारा अधिकारी म्हणून त्याची ओळख होती. गेले अनेक दिवसांपासून वृध्दापकाळाच्या आजाराने आजारी असल्यामुळे त्यांचेवर येथील खाजगी व स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न देता त्यांनी २१ मार्च रोजी पहाटे १:३० वाजता अखेरचा श्वास घेतला.
त्यांचे पश्चात संजय, विजय आणि अजय हे तीन मुले, दोन मुली नातवंडे आदि परिवार आहे. येथील शिक्षक मैत्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष विजय रापतवार यांचे ते वडील होत.
