केज

Spread the love

९ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणा-या वयोवृध्द आरोपीची केज न्यायालयाने जामीन फेटाळली.

केज- बिड जिल्हातील दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावामध्ये आरोपी नामे बाबुराव केरबा निरडे, वय-८३ वर्षे याने २८ जानेवारी २०२६ रोजी शाळेत जाणा-या ९ वर्षीय बालिकेस चॉकलेटचे आमिष दाखवुन घरात बोलावून हात पाय दाबायला सांगितले व नंतर तिचे पुर्ण कपडे काढुन तिच्या *प्रायव्हेट पार्टला हळद-कुंकू लावून तोंडातुन मंत्र उच्चारून तसेच शरिरावरून लिंबु फिरवुन* अत्यंत किळसवाणी अघोरी पुजा करून अत्याच्यार केला होता. सदर आरोपी विरूध्द पिडीत बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरून बलात्कार व पोस्को कायद्यान्वये तसेच जादुटोणा विरोधी कायद्यान्वये दिंद्रुड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविला होता.

सदर आरोपीने केज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला असता मा. सत्र न्यायाधीश श्रीमती आर. के. शेख मॅडम यांनी अंत्यत घृणास्पद व जादुटोणा सारखी अघोरी पुजा करून अत्याचार तसेच समाजामध्ये अंधश्रध्दा निर्माण करणा-या आरोपीची दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी जामीन फेटाळली.

सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकिल म्हणून अॅड आर. बी. बिरंगळ आणि त्यांना सहायक सरकारी वकिल म्हणुन अॅड. डि. बी. इंगळे यांनी काम पाहिले.

अॅड. डि. बी. इंगळे सहा. सरकारी अभियोक्ता, अंबाजोगाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement


This will close in 20 seconds

error: Content is protected !!