*भारतातील विविध राज्यांत मुस्लिम अल्पसंख्याकांवरील कथित अत्याचारांविरोधात जिल्हा अधिकारी कार्यालय बीड यांच्यामार्फत पत्रकार आरेफ सिद्दिकी यांचे राष्ट्रपतींकडे निवेदन.*
आंबेजोगाई प्रतिनिधी. देशातील विविध राज्यांमध्ये मुस्लिम अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या कथित अत्याचार व भेदभावपूर्ण कारवायांविरोधात कठोर पावले उचलावीत, तसेच संविधानिक हक्कांचे संरक्षण करावे, या मागणीसाठी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पत्रकार आरेफ सिद्दिकी यांनी निवेदन सादर केला.
भारत सरकार, नवी दिल्ली यांना उद्देशून तयार करण्यात आलेले हे निवेदन माननीय जिलाधिकारी कार्यालय, बीड यांच्या मार्फत पुढे पाठविण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, काही राज्यांमध्ये धार्मिक आधारावर भेदभाव, अन्यायकारक कारवाया व सामाजिक तणाव वाढत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या घटनांमुळे संबंधित समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
निवेदनकर्त्यांनी केंद्र सरकारने संबंधित राज्य सरकारांकडून सविस्तर अहवाल मागवून वस्तुस्थितीची चौकशी करावी, तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य व संरक्षण दिले असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच, अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवून सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी जनजागृती कार्यक्रम हाती घ्यावेत, अशी सूचना करण्यात आली आहे.



