अंबाजोगाई

Spread the love

अंबाजोगाईत खालील रफिक शेख यांच्या इनामदारीमुळे महिलेचा ऐवज सुखरूप,,!!

आंबेजोगाई पोलिसांकडून खलील रफिक शेख यांचा विशेष सत्कार,,!!

अंबाजोगाई प्रतिनिधी

अंबाजोगाई: गॅरेज चालवणारे, क्रांतीनगरचे रहिवासी असलेलेखलील रफिक शेख यांनी दाखवलेल्या इमानदारीमुळे एका महिलेचा हरवलेला मौल्यवान ऐवज सुखरूप परत मिळाला आहे. आज १७ फेब्रुवारी रोजी दुपारी चनई परिसरात खलील यांना ८० हजार रुपये रोख, सोन्याचे दागिने आणि मोबाईल असलेली एक पर्स सापडली. डोंगर पिंपळा येथील राधा पवार या महिला आपल्या मुलांना लघुशंकेसाठी थांबल्या असताना ही पर्स विसरून गेल्या होत्या. खलील यांनी कोणतीही लालूच न बाळगता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला आणि ही पर्स पोलीस ठाण्यात जमा केली. पोलिसांनी राधा पवार यांची खातरजमा करून त्यांना हा सर्व ऐवज परत केला. या प्रमाणिक कृत्याबद्दल अंबाजोगाई पोलिसांनी गॅरेज चालक खलील शेख यांचा विशेष सत्कार केला असून, त्यांच्या या आदर्श कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement


This will close in 20 seconds

error: Content is protected !!