अंबाजोगाई

Spread the love

 

*अंबाजोगाई येथे ८ फेब्रुवारी रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव कलादर्पणचे आयोजन*

*~ सांस्कृतिक समिती राज्याध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांची माहिती*

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

इंडियन मेडिकल असोसिएशनचा सांस्कृतिक समितीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कलादर्पण महोत्सव यावेळी अंबाजोगाई (जि.बीड) येथे रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी हॉटेल परिचय हॉल येथे दुपारी २.३० ते ६.३० या वेळेत संपन्न होणार असल्याची माहिती सांस्कृतिक समितीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

 

इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारा दरवर्षी महाराष्ट्रभरातील सर्व सभासद डॉक्टरांसाठी विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यामधील विजेत्या स्पर्धकांना या राज्यस्तरीय कलादर्पण सोहळ्यामध्ये पारितोषके देण्यात येतात. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध डॉक्टर्स उस्फूर्तपणे सहभाग घेत असतात आणि या राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेते स्पर्धक आपापल्या कला कला दर्पणच्या मंचावर सादर करीत असतात. या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून विविध डॉक्टर्स कलाकार आपली उपस्थिती दर्शवीत असतात. या समितीचे राज्यअध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांनी मागील ३ वर्षांपासून हा कार्यक्रम प्रत्येक डॉक्टर्स पर्यंत पोहोचावा यासाठी आटोकाट प्रयत्न केल्याचे या स्पर्धेतील डॉक्टरांच्या सहभागामुळे दिसत आहे. कलादर्पण महोत्सवात डॉ.इंगोले यांच्या अभिनव संकल्पनेतून ताण-तणावात, रूग्णांच्या गर्दीत आपले आयुष्य जगणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या आयुष्यात विरंगुळा म्हणून या स्पर्धा आयोजित करीत असल्याचे मत डॉ‌.राजेश इंगोले यांनी यावेळी व्यक्त केले. प्रत्येक माणूस हा आपल्या आयुष्यामध्ये संसारामध्ये व्यस्त असतो. पण, प्रत्येक माणसांमध्ये कुठली ना कुठली कला असते. डॉक्टर हा देखील एक माणूस असतो तो ही एक कलाकार असतो मात्र वेळेअभावी या सर्व छंदांना नाईलाजाने कुठलेही दर्जेदार व्यासपीठ नसल्यामुळे ही डॉक्टर्स कलाकार मंडळी आपल्या कला छंद जोपासताना दिसून येत नाहीत. अति ताणतणावामुळे प्रत्येक डॉक्टरच्या आयुष्यामध्ये या कलांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे कारण पैसा हा माणसाची भूक मिटवू शकतो परंतु एखादी कला छंद हा माणसाला आयुष्याला जगण्याचा अर्थ प्राप्त करून देतो असे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी यावेळी व्यक्त केले. कला दर्पण या महोत्सवात गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा, नाट्य स्पर्धा रील्स स्पर्धा याचे आयोजन केले जाते व या मधील विजेत्यांना कलादर्पण या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सांस्कृतिक मंचावर या कला सादर करण्याची संधी व पारितोषिक दिले जाते अशी माहिती डॉ.इंगोले यांनी यावेळी दिली. यावेळी इंडियन मेडिकल‌ असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ.संतोष कुलकर्णी यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनचा कला दर्पण हा कार्यक्रम मागील ३ वर्षांपासून अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम ठरला आहे. अवघ्या महाराष्ट्रातील डॉक्टर्स या कला दर्पण महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. डॉ.राजेश इंगोले यांनी सांस्कृतिक समितीचे अध्यक्षपद घेतल्यापासून हा कार्यक्रम एका वेगळ्या वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. महाराष्ट्रातून शेकडो डॉक्टर्स या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि आपल्या कला सादर करतात. हा कार्यक्रम डॉक्टर्स कलाकारांसाठी एक पर्वणी ठरली आहे. अशी माहिती डॉ.संतोष कुलकर्णी यांनी यावेळी देत डॉ.राजेश इंगोले हे या पदाला योग्य न्याय देत सांस्कृतिक समितीचे कार्य धडाडीने पुढे नेत आहेत त्यामुळे त्यांना सलग तीन वर्ष या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे असे गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे अध्यक्ष डॉ.संतोष कुलकर्णी, तेलबिया महामंडळाचे अध्यक्ष तथा अंबाजोगाई पिपल्स बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी, उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे, अधिष्ठाता डॉ.शंकर धपाटे, तहसीलदार विलास तरंगे, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, संघटनेचे राज्य सचिव डॉ.विक्रांत देसाई कोषाध्यक्ष अमोल गित्ते राज्य उपाध्यक्ष डॉ.कल्याण बरमदे, राज्य सहसचिव डॉ.अनुपम टाकळकर, समिती उपाध्यक्ष डॉ.पल्लवी दोडके, समन्वयक डॉ.तुकाराम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कला दर्पण महोत्सवाच्या यशस्वितेसाठी सर्व राज्य पदाधिकारी, सांस्कृतिक समितीचे राज्य सदस्य तसेच अंबाजोगाई स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे सचिव डॉ.उद्धव शिंदे, उपाध्यक्ष डॉ.विजय लाड, कोषाध्यक्ष डॉ.बळीराम मुंडे यांच्यासह राज्य कार्यकारिणी समिती सदस्य डॉ.योगेश मुळे, डॉ.प्रज्ञा किनगावकर, डॉ.नवनाथ घुगे, डॉ.सचिन पोतदार, डॉ.इमरान पटेल, डॉ.सचिन चाटे परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement


This will close in 20 seconds

error: Content is protected !!