*अंबाजोगाईत १ फेब्रुवारी रोजी मोफत बाल हृदयरोग, २-डी इको व कलर डॉपलर तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर*
——————————————-
*घुगे हार्ट ॲण्ड क्रिटीकल केअर हॉस्पिटल व रोटरी क्लबचा उपक्रम – डॉ.नवनाथ घुगे यांची माहिती*
——————————————–
*अंबाजोगाई / प्रतिनिधी*
शहरातील घुगे हार्ट ॲण्ड क्रिटीकल केअर हॉस्पिटल व रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी ,आय.एम.ए. महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम महाराष्ट्र शासन व लिटल हार्ट केअर हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने
१ फेब्रुवारी रविवारी सकाळी ९ ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत घुगे हार्ट ॲण्ड क्रिटीकल केअर हॉस्पिटल, प्रशांत नगर, अंबाजोगाई येथे,
बाल हृदयरोग, २-डी इको व कलर डॉपलर मोफत तपासणी व गरजू रुग्णाची शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक हृदयरोग तज्ज्ञ डॉ.नवनाथ घुगे यांनी दिली.
अंबाजोगाई शहरात घुगे हार्ट ॲण्ड क्रिटीकल केअर हॉस्पिटल व रोटरी क्लब यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून बालकांची मोफत
२-डी इको व कलर डॉपलर तपासणी करून या द्वारे आत्ता पर्यंत १४० बालकांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
अंबाजोगाई, केज, परळी,
धारूर, माजलगाव, कळंब, तालुक्यातील अनेक बालरुग्ण या शिबिराच्या माध्यमातून दुरुस्त झाले. आगामी काळात अशा बालकांना मोफत उपचार उपलब्ध करुन अंबाजोगाई शहरात रविवारी १ फेब्रुवारी रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ
नवनाथ घुगे, पुणे येथील लहान बालकांचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ.पंकज सुगावकर हे रुग्णांची तपासणी करतील. ज्या रुग्णांना हृदय शास्त्रक्रिया आवश्यक असेल त्यांची मोफत शास्त्रक्रिया करण्याची सोय करण्यात येणार आहे.
हे शिबीर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतिश सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिक्कारी डॉ. शेख रौफ, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सचिन शेकडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एल आर तांदळे,तसेच महाराष्ट्र राज्य आय.एम.ए चे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी , सचिव डॉ. विक्रांत देसाई , कोषाध्यक्ष डॉ.अमोल गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
*शिबीरातील तपासण्या व उपचार :-*
या शिबिरात
नवजात बालक ते १८ वर्षापर्यंतच्या सर्व बालकाची मोफत २ डी इको कार्डीओग्राफी व कलर डॉपलर तपासणी.
सर्व प्रकारच्या बालकांमधील हृदयरोगासंबंधी आजारांचे निदान, उपचार व सल्ला.
या पुर्वी ऑपरेशन झालेल्या सर्व बालकांची मोफत फेर तपासणी व पुढील सल्ला.
ऑपरेशन्स करण्याची
आवश्यकता असणाऱ्या सर्व बालकाची लिटल हार्ट केअर हॉस्पिटल, पुणे येथे विविध योजनेच्या माध्यमातून मोफत ऑपरेशन करण्यात येतील.
खालील लक्षणे असणाऱ्या बालकांची तपासणी करण्यात येईल:
बाळ निळसर पडणे, बाळाचे वजन न वाढणे, जोरा जोरात श्वास घेणे,बाळ दुध व्यवस्थित न पिणे, दुध पिताना कपाळावर घाम येणे,बाळाला धाप लागणे, वांरवार निमोनिया होणे, या पैकी कोणतेही लक्षणे किंवा ए.एस.डी.,व्ही.एस.डी., पी.डी.ए, जन्मतः असणारे हृदयांचे आजार या संदर्भात लक्षणेअसल्यास या शिबीरामध्ये तपासणी करुण घ्यावी.शिबीरास येतांना सर्व जुने रिपोर्टस घेवून यावे. तरी या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबच्या अध्यक्षा प्रा. रोहिणी पाठक, सचिव मंजुषा जोशी,धनराज सोळंकी, तालुका आरोग्य अधिकारी
डॉ. बालासाहेब लोमटे, डॉ. श्रीनिवास, रेड्डी, डॉ.सचिन पोतदार, डॉ.अतुल शिंदे, प्रा.संतोष मोहिते, अविनाश मुडेगावकर,कल्याण काळे, बालाजी घाडगे,राधेश्याम लोहिया यांनी केले आहे. तरी गरजू रुग्णांच्या नातेवाईकांनी पुढील
मोबाईल क्रमांकावर 9529753754 नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

हृदय रोगतज्ञ डॉ. नवनाथ घुगे
अंबाजोगाई



