अंबेजोगाई न. प. चे स्वच्छता निरीक्षक अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया आंबेजोगाई च्या वतीने, स्वच्छता दूत पुरस्काराने सन्मानित,,,!
अनंत वेडे यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव,,!!!
आंबेजोगाई प्रतिनिधी
आज दिनांक 27 जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कक्षात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषद आयोजित दर्पण दिन व मूकनायक दिनाचे औचित्य साधून पत्रकारिता सामाजिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यात मनोहर अंबा नगरीचे नगरपालिकेचे स्वच्छता विभाग प्रमुख अनंत वेडे हे नेहमीच स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर असून आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत पहाटेपासून अंबा नगरीच्या स्वच्छतेचे काम करत असतात शिवाय कोरोणा काळातील त्यांचे काम विशेष आणि उल्लेखनीय आहे. कुणाचाही तसेच कधीही कसलाही फोन ते ताबडतोब उचलतात स्वच्छतेच्या बाबतीत जाग्यावर ते समस्या सोडवतात सर्व नागरिकांना तोंडात साखर ठेवून बोलत असतात आणि यामुळेच त्यांना आज दिनांक 27/1/2026 रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषद यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला, यावेळी, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष, अनिल वाघमारे,माजी आमदार, व शिवसेनेच्या उपनेत्या संगीता ताई ठोंबरे,सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेश इंगोले, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती, राजेसाहेब देशमुख, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण विद्यालयाचे, अधिष्ठाता डॉक्टर धपाटे सर, सुप्रसिद्ध एडवोकेट अजित लोमटे, दैनिक प्रजा पत्र चे संपादक संजय मालानी, व इतर पुरस्कारप्राप्त आवर्जून उपस्थित होते. अनंत वेडे यांना पुरस्कार मिळाल्यामुळे, स्वच्छता कर्मचाऱ्यात व आंबेजोगाई शहरात आनंद व्यक्त होताना दिसत आहे.

अनंत वेडे साहेब, आपणास पुढील,
वाटचालीस भरभरून शुभेच्छा,,,!!!
💐💐💐💐💐



