अनंत वेडे स्वच्छता निरीक्षक, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, व डिजिटल मीडिया आंबेजोगाई च्या वतीने स्वच्छता दूत म्हणून सन्मानित,,,
अनंत वेडे स्वच्छता दूत पुरस्काराने सन्मानित,,,!!!
आंबेजोगाई (प्रतिनिधी)
आज दिनांक 27 जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कक्षात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषद आयोजित दर्पण दिन व मूकनायक दिनाचे औचित्य साधून पत्रकारिता सामाजिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यात मनोहर अंबा नगरीचे नगरपालिकेचे स्वच्छता विभाग प्रमुख अनंत वेडे हे नेहमीच स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर असून आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत पहाटेपासून अंबा नगरीच्या स्वच्छतेचे काम करत असतात. त्यांच्यासोबत त्यांचे सहाय्यक म्हणून काम करणारे मल्हारी जोगदंड हे तेवढ्याच तत्परतेने स्वच्छतेच्या बाबतीत काम करत असतात. शिवाय अनंत भिडे यांचे कोरोणा काळातील त्यांचे काम विशेष आणि उल्लेखनीय आहे. कुणाचाही तसेच कधीही कसलाही फोन ते ताबडतोब उचलतात स्वच्छतेच्या बाबतीत जाग्यावर ते समस्या सोडवतात सर्व नागरिकांना तोंडात साखर ठेवून बोलत असतात आणि यामुळेच त्यांना आज दिनांक 27/1/2026 रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषद यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यात व आंबेजोगाई शहरात आनंद व्यक्त होताना दिसत आहे.

न्यूज लोकमन च्या वतीने, आपले ,,,
खूप खूप अभिनंदन साहेब,,,,,!!!
💐💐💐💐💐💐



