भोजनकवाडी सरपंच मारहाण प्रकरनातील पुराव्याअभावी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता आरोपीतर्फे ऍड अनंत सोनवणे.
भोजनकवाडी तालुका परळी ग्रामीण पोलीस स्टेशन शासन विरुद्ध सचिन व इतर R.C.C.187/ 2020 सरपंचांनी कोरोना काळात कंटेनमेंट झोनमध्ये का ठेवले, या रागातून सरपंच यांना बाभळीच्या काठीने डोक्यात मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या तीनही आरोपींची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
गावात संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय नियमानुसार काही भागांत ‘कंटेनमेंट झोन’ करण्यात आले होते. या कारणावरून आणि “आम्हाला गावाबाहेर का ठेवले?” असा जाब सरपंचांना विचारत आरोपी सचिन दिघोळे, महादेव दिघोळे आणि राहुल दिघोळे यांनी सरपंच यांना गावाबाहेर गाठून बाभळीच्या काठीने डोक्यात मारहाण केल्याचा आरोप फिर्यादी पक्षाने केला होता. याप्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, उलटतपासणी दरम्यान बचावाच्या मुद्द्यांनी या प्रकरणाला वेगळे वळण दिले.
राजकीय वैमनस्याचा मुद्दा: आरोपींचे वकिल ऍड अनंत सोनवणे असा युक्तिवाद केला की, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये या आरोपींनी सरपंचांना मतदान केले नव्हते. “मला मतदान का केले नाही?” याचा राग मनात धरून सरपंचांनी त्यांना गावाबाहेर ठेवले होते आणि त्यातूनच हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


