फिल्मी स्टाईल मारहाण आणि जातीयवादाच्या कथित प्रकरणातील आरोपी शिवाजी गीतेला अटकपूर्व जामीन मंजूर.
अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; ॲड. अनंत सोनवणे यांनी केली बाजू मांडणी केली.cri bail application 560 /2025
परळी, ११ डिसेंबर (आमच्या प्रतिनिधीकडून):
तालुक्यातील टोकवाडी येथील शिवराज दिवटे यांना परळी नजीकच्या रत्नेश्वर जंगलाच्या डोंगरामध्ये फिल्मी स्टाईलने मारहाण करून, त्याचा व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपी शिवाजी राजीव गीते यास अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी शिवराज दिवटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी शिवाजी गीते आणि इतर काही जणांनी त्यांना रत्नेश्वर जंगलात नेले. तिथे त्यांना मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीचा व्हिडिओ देखील चित्रित करण्यात आला. तसेच, यावेळी जातीयवाचक शिवीगाळ आणि अत्याचार झाल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला होता. या तक्रारीवरून संबंधित संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी शिवाजी गीते यांनी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केले.
आरोपीतर्फे न्यायालयात ॲड. अनंत सोनवणे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. सोनवणे यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे ‘फिल्मी स्टाईल’ स्टोरी तयार करण्यात आली असून, आरोपीला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात येत आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि प्रकरणाची सखोलता लक्षात घेता, अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी शिवाजी राजीव गीते यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आणि त्यांना दिलासा दिला.


