तहसीलदार मारहाण प्रकरणी महसूल मंत्र्यांना व्हिडिओ व ऑडिओ क्लिप देऊन सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा ……………….लोक जनशक्ती पार्टी
अंबाजोगाई : प्रतिनिधी
अतिवृष्टीने झालेल्या शेतीचे पंचनामे करण्या विषयी शेतकरी नेत्याने अंबाजोगाई तहसीलदार तथा प्रथम न्याय दंडाधिकारी यांना विनंती केली असता तहसीलदार साहेबांनी शेतकरी नेत्यास जबर मारहाण केली हा घडलेला सर्व प्रकार संबंधित शेतकरी नेत्यांनी आम्हाला सांगितला की माझा खूप अपमान झाला आहे मला जीवन जगण्याची इच्छा राहिली नाही म्हणून मी आत्महत्या करणार आहे हा गंभीर प्रकार भीमशक्ती आणि लोक जनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्याला सांगितला असता या सर्व घटनेचे गांभीर्य पाहता आम्ही घटनेची सर्व सत्यता जाणून घेऊन माननीय अप्पर जिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना निवेदन देऊन अंबाजोगाई तहसीलदार यांची चौकशी करून तहसील कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज संरक्षित करून ठेवण्यात यावे जर संबंधित सीसीटीव्ही फुटेज डिलीट केल्या तर त्यामध्ये तहसीलदार यांना दोषी धरून कारवाई करण्यात यावी व त्याना निलंबित करण्यात यावे या आशयाची मागणी केली जर सखोल चौकशी करून गुन्हा दाखल झाला नाही तर लोकशाही मार्गाने भिम शक्ती व लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला यावेळी यावेळी लोक जनशक्ती पार्टी युवाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहुळे बीड जिल्हा अध्यक्ष अशोक काळे (पाटील) विशाल शेवाळे आदित्य चौरे अकबर शेख भीमशक्ती सामाजिक संघटनेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष भीमराव सरवदे जीवन घाडगे सुमित आवाडे रवी आवाडे अविनाश सरवदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


