तात्या-आभई आदर्श प्रतिष्ठान अंबाजोगाई चे सेवा गौरव पुरस्कार जाहीर
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
अंबाजोगाई येथील तात्या-आभई आदर्श प्रतिष्ठान अंबाजोगाई च्या वतीने अँड.अण्णासाहेब लोमटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारे सेवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून येत्या १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आलेल्या पुरस्काराचा विशेष कार्यक्रम आयोजित करून हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे सचीव अँड.राजेंद्रप्रसाद धायगुडे यांनी दिली आहे.
या संदर्भात प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात पुढे असे म्हटले आहे की सदरील पुरस्कार हे १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता विलासराव देशमुख सभागृह नगरपरिषद अंबाजोगाई येथे पुरस्काराचा विशेष कार्यक्रम आयोजित केला असून सदरचे पुरस्कार व विशेष सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. नंदकिशोरजी मुंदडा-ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते. कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री. राजकिशोरजी मोदी-मा. नगराध्यक्ष,अंबाजोगाई. प्रमुख उपस्थिती मा.श्री. पृथ्वीराज साठे मा. आमदार, केज विधानसभा. मा.श्री. प्रभाकर वाघमोडे मा. समाजकल्याण सभापती, जि.प. बीड.मा.श्री. दगडूदादा लोमटे ज्येष्ठ साहित्यीक, अंबाजोगाई. मा.श्री. रामराव आडे सर सेवानिवृत्त सहशिक्षक योगेश्वरी नूतन विद्यालय अंबाजोगाई.यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहेत.
तात्या -आभई आदर्श प्रतिष्ठान अंबाजोगाई च्या वतीने मागील चार वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सेवा गौरव पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. यावर्षीही विधी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ विधिज्ञ अँड. अशोक विनायकराव कुलकर्णी यांना विधी सेवा गौरव पुरस्कार, आरोग्य सेवेतील विशेष कार्याबद्दल डॉ. देवराव बाबुराव जामनेर यांना “आरोग्य सेवा गौरव पुरस्कार”, शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीमंती रेखा सुभाष बडे-चोले यांना “शिक्षण सेवा गौरव पुरस्कार”, पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रशांत माणिकराव बर्दापूरकर यांना “पत्रकारिता गौरव पुरस्कार” तर सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शेख मुख्तार यांना “समाजसेवा गौरव पुरस्कार ” प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच योगेश्वरी नूतन विद्यालयाचे शिक्षक,साहित्यिक,कवी भागवत रामकृष्ण मसणे सर व कु. रुद्राणी नवनाथ चौरे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
सदरील पुरस्कार हे अँड. राजेंद्रप्रसाद धायगुडे यांचे गुरु ज्येष्ठ विधिज्ञ कै.अँड.आण्णासाहेब लोमटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तात्या-आभई आदर्श प्रतिष्ठान अंबाजोगाई या संस्थेचे सचिव अँड.राजेंद्रप्रसाद धायगुडे व संयोजन समिती हे मागील चार वर्षांपासून देत असून सदरील पुरस्कार
वितरण सोहळ्यास आपण उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठान चे सचीव अँड.राजेंद्रप्रसाद धायगुडे व इतर संचालकांनी केले आहे.


