छावा क्रांतिवीर सेनेच्या कामगार मराठवाडा अध्यक्षपदी युवराज घाडगे पाटील यांचे निवड
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई चे भूमिपुत्र युवक नेतृत्व युवराज घाडगे पाटील यांची छावा क्रांतीवीर सेनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली असून सदरील नियुक्तीचे पत्र छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या हस्ते दसरा मेळाव्यात देण्यात आले.
मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या तालमीत तयार झालेले बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई चे भूमिपुत्र युवराज घाडगे पाटील यांचा बीड जिल्ह्यात सह मराठवाड्यात मोठा मित्रपरिवार असून हजारो युवकांच जाळ निर्माण करणारा संघर्षशील कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे त्याचबरोबर गेली एक दशक मराठा आरक्षण चळवळ सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी युवराज घाडगे पाटील यांच्यावर कामगार मराठवाडा अध्यक्ष पदाची धुरा सोपवली असून सदरील निवडीचे पत्र देताना कामगार नेते अभिजीत राणे प्रदेश महासचिव शिवाजी मोरे छावा क्रांतिवीर संघटनेचे सर्व जिल्हाध्यक्ष प्रदेश कार्यकारणी तसेच भरत जाधव, ऋषी दादा लोमटे, हनुमंत कोल्हे,प्रभाकर मस्के,कृष्णा दायमा, अक्षय पौळ अमोल भैया खुणे यांची उपस्थिती होती. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे आगामी काळात गाव तिथे शाखा निर्माण करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ कामगारांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार छावा क्रांतिवीर सेनेचे नवनियुक्त कामगार मराठवाडा अध्यक्ष युवराज घाडगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.


