अंबाजोगाई

आंबेजोगाई शहर मे नाम ही काफी है,, पो. नि. शरद जोगदंड

Spread the love

अंबाजोगाई शहर मे पो. नि. शरद जोगदंड, नाम ही काफी है,,,!

धडाकेबाज चार कार्यवाहीत, चार जण ताब्यात,,

 

आंबेजोगाई (प्रतिनिधी)

जिगरबाज पोलीस निरीक्षक शरद जोगदंड हे जसे जॉईन झाले तसे आंबेजोगाई शहरासह इतर परिसरात गुन्हेगारांचे त्याचबरोबर नंबर दोन वाल्यांचे धाबे दणाणले असून, 27 सप्टेंबर रोजी च्या कार्यवाहीत, जिगरबाज पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी चार धडाकेबाज कार्यवाहीत चार जण ताब्यात घेतले आहेत.

कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक, शरद जोगदंड यांचे सतत अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी धाडसत्र सुरू असतानाच काल 27 सप्टेंबर रोजी गु. र. न. 481/2025 कलम 65 (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 प्रमाणे स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीररित्या दारूची चोरटी विक्री करणाऱ्या रुपेश बनसोडे याला ताब्यात घेतले तर दुसऱ्या कार्यवाहीत शहर हद्दीत प्रोहिबिशन रेड मध्ये रिंग रोड छत्रपती चौकात इसनामे नंदलाल भैयालाल परदेशी याला अवैद्य रित्या देशी दारू विक्री करत असताना तुळजाभवानी हॉटेल येथे अचानक पणे प्रोहिबिशन रेड केली असता त्या ठिकाणी स्कुटी क्रमांक एम एच 44 डब्ल्यू 97 70 मध्ये माल मिळून आला त्यालाही गुरन. 484/2025 कलम 65 (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 प्रमाणे,पोलीस निरीक्षक जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सोपनि कांबळे, गायकवाड, चादर,लाड यांनी ताब्यात घेतले. पोह अमोल गायकवाड यांनी पंचा समक्ष माल व साहित्य जप्त केले. एक ना अशा जवळजवळ चार गुन्ह्यात शहर पोलिसांनी वेगवेगळ्या चार कार्यवाहीत चार जणांना अटक केली असून, जिगरबाज पोलीस निरीक्षक, शरद जोगदंड यांच्या सततच्या धाडसत्राने गुन्हेगारांचे व दोन नंबर वाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!