राज्यभरातील स्पर्धकांच्या उपस्थितीत न्यूज लोकमन चा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा,,,!
राज्यभरातील स्पर्धक व मान्यवरांच्या उपस्थित न्यूज लोकमन चा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा,,,,!
आंबेजोगाई (प्रतिनिधी)
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी न्यूज लोकमन च्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यवाचन व फिल्मी गीत (कराओके) स्पर्धेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमात प्रथम सत्रात काव्य वाचन, स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य प्रा. गौतम गायकवाड, व हरिनारायण गरजे गायक कवी आदर्श शिक्षक व मु. बळीराम जोगदंड यांच्या शुभ हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुष्प अर्पण करून केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षक आदर्श गायक, गरजे साहेब,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण जी. प. परभणी हे आवर्जून उपस्थित होते. या काव्य वाचन स्पर्धेत, राज्यभरातील कवींनी आपला सहभाग नोंदवला यात परीक्षक म्हणून मोलाची कामगिरी
प्रा. जनार्दन सोनवणे, प्रा. आशिष कांबळे, प्रा. रमेश मोठे, यांनी पार पाडली.
त्याचबरोबर, फिल्मी गीत गायन कराओके स्पर्धेला राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला याचे उद्घाटन, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ तथा गायक क्रिकेटपटू शिक्षण सभापती मा. राजेश इंगोले यांच्या शुभहस्ते तसेच यशवंत सेनेचे सर्वेसर्वा मा. बालासाहेब दौडतले, व मुख्य उपकार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण व हरिनारायण गरजे यांच्या सुमधुर गायनाने पार पडले यात राज्यभरातील नवोदित व मुरब्बी गायधने आपला सहभाग नोंदवला व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले..
शेवटी बक्षीस वितरण, सामाजिक कार्यकर्ते तथा इंजिनीयर एन डी शिंदे साहेब, डॉ. राजेश इंगोले , अंकुश चव्हाण साहेब,त्याचबरोबर आदर्श शिक्षक विजयजी रापतवार, माजी नगरसेवक मसने, हरिनारायण गरजे, काँग्रेसचेआंबेजोगाई शहराध्यक्ष बाबा खतीब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यात काव्य वाचन स्पर्धेत प्रथम
1. श्री भालेराव वाशिम तर द्वितीय माननीय श्री सिद्राम सोळंके आणि तृतीय वैशाली देशमाने दिंद्रुड यांनी क्रमांक पटकावला. यात उत्तेजनार्थ गणेश गायकवाड धीरज चव्हाण रामकिसन डोळस यांनी बक्षीस मिळवले, त्याचबरोबर राज्यस्तरीय फिल्मी गीत कराओके गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक विभागून उन्नती मुंडे, मलंग शहा अकोला, तर द्वितीय क्रमांक विभागून राहुल मोरे ऋषिकेश कांबळे पुणे, तृतीय क्रमांक वैष्णवी सांगळे बळीराम उपाडे अंबाजोगाई तर उत्तेजनात प्रतीक्षा कस्तुरे महेश कांबळे दिव्यांश सुरवसे यांनी पारितोषिक मिळवले यांना मान्यवरांच्या हस्ते, रोख रक्कम मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. सुरेख व बहारदार सूत्रसंचलन प्रसिद्ध शाहीर, श्री मामा काळे, सुप्रसिद्ध शाहीर, तुकाराम सुवर्णकार यांनी केले. तर संयोजक म्हणून मोलाची जबाबदारी प्रयास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. महादेव माने यांनी पार पाडली. त्याचबरोबर,बालाजी ब्रास बँड चे सर्वेसर्वा मंगेश माने, पत्रकार उमेश शिंदे, उर्दू न्यूज चे संपादक आरिफ सिद्दिकी, अंबाजोगाई दर्शन चे संपादक सतीश मोरे, संग्राम महाराष्ट्राचे संपादक अभिजीत लोमटे,
नवी वार्ता चे संपादक नयम सय्यद, जंग चे पत्रकार असलम पठाण, मयूर शिंदे यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून कलावंतांनी हजेरी लावली होती. व या बहारदार कार्यक्रमासाठी आंबेजोगाईकरांनी एकच गर्दी केली होती.


