मा.महादेव आदमाने आंबेजोगाई शहराध्यक्ष यांनी शहराची कार्यकारिणी जाहीर केली,,,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अंबाजोगाईत महादेव आदमाने शहराध्यक्ष यांनी केली,शहर कार्यकारिणी जाहीर,,,,!
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबाजोगाई शहराची शहर कार्यकारिणी नुकतीच शहराध्यक्ष महादेव आदमाने यांनी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी, बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण व अंबाजोगाई शहराध्यक्ष महादेव आदमाने ,मनोज लखेरा, बबनराव लोमटे, खालेद चाऊस , सुनील वाघाळकर यांची एक बैठक होऊन त्यामध्ये सर्वसमावेशक अशी अंबाजोगाई शहर कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्या अनुषंगाने शहराध्यक्ष महादेव आदमाने यांनी शुक्रवार दि ५ सप्टेंबर रोजी सदर शहर कार्यकारिणी घोषित केली. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक अशी कार्यकारिणी गठीत करून सर्वांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी च्या सूचना सर्व सदस्यांना राजकिशोर मोदी, राजेश्वर चव्हाण तसेच महादेव आदमाने यांनी दिल्या आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना. अजितदादा पवार , प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्याचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या हितासाठी सुरू केलेली चळवळ तसेच महाराष्ट्र शासन राबवित असलेल्या सर्व महत्वकांक्षी योजनांची माहिती वॉर्डा वॉर्डातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचाव्या यासाठी पक्षाच्या वतीने राज्य, विभाग, जिल्हा , तालुका तसेच शहर व ग्राम पातळीवर पदाधिकारी नेमण्यात येत असतात. नुकतेच काही दिवसांपूर्वी अंबाजोगाई राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष म्हणून येथील धडाडीचे कार्यकर्ते माजी नगरसेवक महादेव आदमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर उर्वरित अंबाजोगाई शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष महादेव आदमाने यांनी रोजी जाहीर केली.
जाहीर करण्यात आलेल्या अंबाजोगाई शहर कार्यकरिणीमध्ये प्रा. शैलेश जाधव यांची अंबाजोगाई शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महासचिव पदी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंबाजोगाई शहर उपाध्यक्ष पदासाठी येथील तळागाळातील कार्यकर्त्यांची नाळ जुळलेले पंडितराव हुलगुंडे , सय्यद रशिद भाई,अशोक देवकर , शाकेर काजी, शेख मुक्तार, सुशील वाघमारे , प्रशांत पवार यांच्यासारख्या उमद्या कार्यकर्त्यांची निवड आदमाने यांनी केली आहे. यांच्यासह कचरूलाल सारडा यांची कोषाध्यक्ष तर कैलास कांबळे हे सहकोषाध्यक्ष , तसेच अॅड. अनिल लोमटे यांच्यासह जमील भाई व अनिल पसारकर यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर सहसचिव म्हणून दौलत मिरखॉ , मुनीर शहा , मुन्ना वेडे, राम घोडके, रोहन कुरे, दिपक मस्के , शरद काळे , तौसिफ सिध्दीकी , माऊली मांदळे , शेख जावेद खलील, मतीन जरगर , अमजद परसुवाले , गुलाब बोराडे यांची सहसचिव या पदासाठी निवड करून यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबाजोगाई शहर संघटक म्हणून शेख वजीर , सय्यद रौफ , निसार बेग, जुनेद नाना बागवान , प्रवीण जायभाये, सुशिल जोशी, विशाल पोटभरे आणि शेख शाहिद यांची नियुक्ती केल्याचे अंबाजोगाई शहराध्यक्ष महादेव आदमाने यांनी जाहीर केले आहे.
अंबाजोगाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी, बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, ऍड विष्णुपंत सोळंके, तालुका अध्यक्ष राजाभाऊ औताडे, अंबाजोगाई शहराध्यक्ष महादेव आदमाने, केज विधानसभा अध्यक्ष बालासाहेब शेप, माजी नगरसेवक बबनराव लोमटे, खालेद चाऊस यांच्यासह आदींनी अभिनंदन करत पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
