डॉ. अखिला गौस मराठवाडा जनरल सेक्रेटरी पदी,,!
ऑल इंडिया उल्मा बोर्ड न्यू दिल्ली विंगच्या मराठवाडा जनरल सेक्रेटरी पदी डॉ.अखिला गौसयांची नियुक्ती,,,!
आंबेजोगाई प्रतिनिधी
ऑल इंडिया उलमा बोर्ड न्यू दिल्ली एज्युकेशन विंगच्या मराठवाडा विभागाच्या जनरल सेक्रेटरी पदी मराठवाड्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व गझलकार माजी प्राचार्य महिला महाविद्यालय आंबेजोगाई येथील डॉक्टर अखिला गौस यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती, त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि नेतृत्व गुणांच्या आधारावर, करण्यात आली आहे.
डॉक्टर अखिला यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक वर्ष कार्य केले असून, त्यांचा अनुभव आणि समर्पण यामुळे मराठवाडा विभागातील शैक्षणिक विकासाला नवीन दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे महाराष्ट्रभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. डॉ. अकेला यांचा संक्षिप्त परिचय : डॉक्टर अकेला या मराठवाड्यातील एक प्रख्यात शिक्षणतज्ञ आणि विशेष म्हणजे गझलकार समाजसेवक मनमिळाऊ स्वभावाच्या त्यांनी, महिला महाविद्यालय आंबेजोगाई येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असताना अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले, त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान त्यांना एक आदर्श व्यक्तिमत्व बनवते. :
अभिनंदन आणि शुभेच्छा:
ऑल इंडिया उलमा बोर्ड न्यू दिल्ली एज्युकेशन विंग मराठवाडा अध्यक्ष नजीर अहमद सर यांनी डॉक्टर अकेला यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. मराठवाडा विभागातील शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरेल अशी यावेळी विश्वास व्यक्त केला आहे.
