केज पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा नागरगोजे साहेब यांनी स्वीकारला पदभार*
*आर.पी.आय.(आंबेडकर) पक्षाच्या पदाधिकारी यांच्या वतीने केला सत्कार*
केज प्रतिनिधी
केज येथील पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकारी (BDO) या पदाचा कार्यभार विठ्ठल नागरगोजे साहेब यांनी नुकताच स्वीकारला आहे.
विठ्ठल नागरगोजे साहेब यांनी पंचायत समिती केज (BDO) या पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आंबेडकर) या पक्षाच्या पदाधिकारी यांच्या वतीने दि.०३.०९.२०२५ रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष भगवंत (आप्पा)वायबसे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जाधव, तालुका अध्यक्ष अश्रुबा (दादा)खरात,तालुका संघटक नवनाथ सोनवणे,अमोल जगताप,इंगळे,
महादेव केदार,आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
