नैराश्याला कंटाळून पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांची आत्महत्या,,,?
आंबेजोगाई त निलंबित पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांची आत्महत्या,,,!
आंबेजोगाई प्रतिनिधी
सुनील नागरगोजे हे काही महिन्यापूर्वी निलंबित झाले होते. सनासुदीसाठी नागदरा या आपल्या मूळ गावी कुटुंबीय गेली असता, काल सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान त्यांनी आत्महत्या केल्याचे, उघडकीस आले.
अनेक वर्षापासून सुनील नागरगोजे कुटुंबिया बरोबर आंबेजोगाईत राहत होते. त्यांनी बीड, लातूर, परभणी येथे सेवा केली असून, परभणी येथे त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्यांबरोबर भांडणं झाली होती. त्या प्रकरणात त्यांची चौकशीही चालू होती. याशिवाय बीडला बदली झाल्यानंतरही त्यांनी एका कर्मचाऱ्याला धमकावले होते. परभणीच्या प्रकरणात एप्रिल 2025 या महिन्यात ते निलंबित झाले होते. तेव्हापासून ते एकल कॉलेच राहिल्यासारखे राहत होते. आपले सर्व कुटुंबीय नागदरा या मूळ गावी सणासुदीसाठी गेले असल्याने, ते आंबेजोगाई च्या राहत्या घरी एकटेच असल्याने, त्यांनी सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड हे आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले.
