अडत व्यापारी यांचा मृतदेह सापडला,,,!
पुराच्या पाण्यात चार चाकी सह नितीन कांबळे आडत व्यापारी यांचा मृतदेह सापडला
धारूर प्रतिनिधी दिनांक 27
अंजनडोह येथील आडत व्यापारी नितीन शिवाजीराव कांबळे वय 42 आपल्या चारचाकीसह रुई कडून अंजनडोह कडे जात असताना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती त्यांचा मृतदेह आज पहाटे सकाळी गावकऱ्यांना नदीकाठी आढळून आला.
गेल्या दोन-तीन दिवसापासून तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत असून वाण नदीला मोठा पूर आला आहे वाण नदीवरील धरण भरून वाहत असून आवरगाव अंजनडोह पूल पाण्याखाली गेले आहेत बुधवारी रात्री रोही धारूर अंजनडोकडे धारूर येथील अडत व्यापारी नितीन शिवाजीराव कांबळे हे आपल्या टाटा कंपनीच्या झेष्ठ चार चाकी वाहनाने जात असताना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे वाहनासह वाहून गेले गावकरी महसूल प्रशासन व पोलिसांनी रात्री दोन वाजेपर्यंत त्यांचा शोध घेतला सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुलापासून एक किलोमीटर अंदाजे अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला प्रशासनाने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी धारूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
मुसळधार पावसामध्ये नितीन कांबळे यांचा मृत्यू झाला असल्याकारणाने गावावर शोककळा पसरली आहे.
