सुप्रसिद्ध ॲड. विलास लोखंडे साहेब यांची कन्या.कू.समीक्षा विलास लोखंडे हिचे वेटलिफ्टिंग स्पर्धेत यश,,,,!
संपूर्ण जिल्ह्यातून समीक्षा वर अभिनंदनचा वर्षाव,,,!
आंबेजोगाई (प्रतिनिधी)
क्रीडा युवक संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड यांच्या आणि आंतर शालेय जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या 17 वर्षीय मुलींच्या वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये जिल्हा पातळीवर जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी समीक्षा विलास लोखंडे हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या जोधाप्रसाद जी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील समीक्षा विलास लोखंडे हिने आंतरशालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये जिल्हा पातळीवर 17 वर्षी मुलींच्या गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावून यश संपादन केले आहे. नुकत्याच जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड यांच्या वतीने क्रीडा स्पर्धेची सुरुवात करण्यात आली यामध्ये समीक्षा विलास लोखंडे हिने वेटलिफ्टिंग स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून संस्थेचे व शाळेचे नाव उंचावले आहे. या अगोदरही समीक्षाने वेटलिफ्टिंग तायक्वांदो किक बॉक्सिंग गोळा फेक अशा विविध स्पर्धेमध्ये यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाई, तसेच न्यूज लोकमन च्या वतीने आणि मस्के परिवाराच्या वतीने समीक्षा दीदीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन,,,,! व पुढील वाटचालीस शुभेच्छा,,,,..!🌹🌹🌹🌹
